पुस्तके माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन - पालकमंत्री शंभूराज देसाई; ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप उत्साहात

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा : पुस्तक हे माणसाच्या विचारविश्वाला समृद्ध करणारे सर्वात प्रभावी साधन आहे, असे सांगून जिल्ह्यात वाचन चळवळ बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सातारा यांच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचा समारोप नाडे येथील कृष्ण लीला गार्डन मंगल कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाला.

पालकमंत्री देसाई म्हणाले, समाजामध्ये ज्ञानाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा ग्रंथोत्सवांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात वाचन संस्कृती अधिक बळकट व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातील.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथोत्सवाचे ग्रंथ प्रदर्शन ३० मार्च २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाले होते. या प्रदर्शनात विविध नामांकित प्रकाशन संस्थांची शैक्षणिक, साहित्यिक, ऐतिहासिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तसेच विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांसह शिक्षक, वाचनप्रेमी आणि नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने भेट दिली.

या कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी, स्थानिक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, वाचनप्रेमी नागरिक तसेच ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती
पुढील बातमी
महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन; राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी