सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साबळेवाडी ता.सातारा येथे झालेल्या अपघात प्रकरणी प्रज्वल रामचंद्र जगताप (वय 26, रा. भणंग ता.जावली) याच्याविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अशोक विष्णूपंत मोरे (वय 64, रा. नुने ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. 9 जुलै रोजी हा अपघात झाला आहे. अपघातात विश्वनाथ रघुनाथ कुर्लेकर (वय 52, रा. नुने) हे जखमी झाले आहेत.