स्वप्नं आणि गोष्टीनी सदैव गजबजलेल्या मुंबापुरीत या वर्षाचा सर्वात मोठा सिनेमॅटिक जलसा होणार आहे. जागरण फिल्म फेस्टिव्हल (JFF) या भारतातील सर्वात मोठ्या फिरत्या फिल्म फेस्टिव्हलची बारावी आवृत्ती या गजबजलेल्या स्वप्ननगरीत घेऊन येत आहे, ‘गुड सिनेमा फॉर एव्हरीवन’. दिल्ली, प्रयागराज, वाराणसी, रायपूर, रांची, इंदूर, सिलीगुडी, कानपूर, लखनौ, पटणा, मीरठ, गोरखपूर, आग्रा, लुधियाना आणि डेहराडून येथील फिरतीत या फेस्टिव्हलने चित्रपटप्रेमी आणि रसिकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले आणि त्यांच्या काळातील काही अप्रतिम कलाकृतींचा आस्वाद त्यांना घेता आला. या शहरांमध्ये अनेक सेलिब्रिटीजनी आणि नाट्य उद्योगातील मान्यवरांनी फेस्टिव्हलचा व्यापक प्रचार केला आणि विविध विषयांवरील चर्चांमध्ये ते सहभागी झाले. हे फेस्टिव्हल मुंबईत पोहोचण्यापूर्वी 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हिसार आणि दरभंगा येथे साजरे होणार आहे. 6 मार्च ते 9 मार्च दरम्यान हा सोहळा फन सिनेमाज, अंधेरी पश्चिम येथे आयोजित होणार आहे. चित्रपटसृष्टीच्या राजधानीत होणारा हा सोहळा म्हणजे स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी, कथाकारांसाठी आणि स्वतंत्र दिग्दर्शकांसाठी एक नामी पर्वणी असणार आहे.
तब्बल 4787 एंट्रीजमधून 292 असामान्य फिल्म्स, शॉर्ट्स आणि डॉक्युमेंटरीजची निवड करण्यात आली आहे, ज्यातून 78 भाषा आणि 111 देशांतील विविधतेचे वैभव उघड होईल. हे फेस्टिव्हल आपली अद्भुत पोहोच आणि समावेशकता सिद्ध करत, 100 पेक्षा जास्त दिवसांपासून 11 राज्यांमधील 18 शहरांचा दौरा करून अखेरीस मुंबईत येत आहे. ‘गुड सिनेमा फॉर एव्हरीवन’ या थीमसह जागरण फिल्म फेस्टिव्हल कथाकथनाची क्रांतिकारी ताकद दर्शविते. या फेस्टिव्हलमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट, मास्टरक्लासेस, पॅनल चर्चा आणि प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांचा समावेश आहे. या फेस्टिव्हलची ठळक आकर्षणे पाहायला मिळणार आहे.
मुकेश छाब्रा: अनव्हीलिंग हू ही इज कास्टिंग नेक्स्ट, देव फौजदार आणि जयंत देशमुख यांच्यासमवेत एक थिएटर पॅनल ग्रामर ऑफ सिनेमा, श्रुती महाजनच्या कास्ट-ओ-मीटर समवेत एक कास्टिंग सत्र, पंकज कपूर सह एक खास संवाद आणि इतर बरेच काही. स्वतंत्र सिनेमावर प्रकाशझोत असेल आणि त्यातही भारतात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन चित्रपटनिर्मितीचे भविष्य घडवणाऱ्या दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेत्यांवर विशेष फोकस असेल. 9 मार्च रोजी एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्याने या समारंभाची सांगता होणार आहे. या प्रसंगी उल्लेखनीय प्रतिभावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
मुंबईतील फेस्टिव्हलविषयी बोलताना जागरण प्रकाशन लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष बसंत राठोड म्हणाले, “बऱ्याच काळापासून या अद्भुत प्रवासाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. जागरण फिल्म फेस्टिव्हलचे आमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हे फेस्टिव्हल विविध शहरांतील चित्रपट रसिकांना एकत्र आणते आणि प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या माध्यमातून त्यांना जोडण्याचे काम करते. आमच्यासाठी सिनेमा ही केवळ एक कला नाही- ते एक अत्यंत सामर्थ्यशाली माध्यम आहे, जे जोडते, प्रेरणा देते आणि अर्थपूर्ण चर्चेला चालना देते.’ असे ते म्हणाले.
100 दिवसांपेक्षा अधिक चाललेल्या या सिनेमॅटिक प्रवासानंतर जागरण फिल्म फेस्टिव्हल (JFF) ची सांगता मुंबई मुक्कामी 6 ते 9 मार्च दरम्यान होत आहे. जागरण फिल्म फेस्टिव्हल (JFF)च्या या 12 व्या आवृत्तीत भारतीय चित्रपट आणि रंगमंचावरील मोठमोठ्या कलाकारांनी वर्णी लावली आहे. जागरण फिल्म फेस्टिव्हल मुंबईत फन सिनेमाज, अंधेरी पश्चिम येथे दिनांक 6 ते 9 मार्च 2025 दरम्यान योजण्यात येणार आहे आणि पुरस्कार सोहळा 9 मार्च 2025 रोजी JW मॅरियट येथे सायंकाळी योजण्यात येणार आहे.
या फेस्टिव्हलच्या मुंबईतील मुक्कामात इन कॉन्व्हर्सेशन, पॅनल चर्चा आणि मास्टरक्लासेसचा समावेश आहे. यावेळी मुकेश छाबरा प्रेक्षकांसमोर आपला आगामी कास्टिंग प्रोजेक्ट उघड करतील. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि मग नवाजुद्दिन सिद्दिकी यांच्या सोबत एक इन कॉन्व्हर्सेशन सत्र असेल. 7 मार्च रोजीच्या वेळापत्रकात आणखी एक इन कॉन्व्हर्सेशन सत्र असेल तसेच एक कार्यशाळा असेल कोरिओमाइंड: जिऑमेट्री ऑफ डान्स आणि ग्रामर ऑफ सिनेमावर थिएटर पॅनल चर्चा असेल, ज्यात सहभागी असतील, देव फौजदार आणि जयंत देशमुख. 8 मार्च रोजी रंगमंच उद्योगावर एक पॅनल चर्चा आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये कुमुद मिश्रा, गोपाल दत्त आणि शुभ्रज्योती बरत सारखे दिग्गज सहभागी होतील. शेवटच्या दिवशी, 9 मार्च रोजी पंकज कपूर सोबत एक इन कॉन्व्हर्सेशन सत्र असेल.