सातारा : छत्रपती शिवरायांच्या शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्या किल्ले प्रतापगडला 4 ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे पथक भेट देणार आहे. या संभाव्य दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित विभागांना सज्जतेच्या सूचना दिल्या असून या दौर्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. या दौर्यामुळे प्रतापगडाच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील समावेशाचा मार्ग सुकर होणार आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा व तामिळनाडू मधील जिंजीच्या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून हा किल्ला उभा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची साथ देणार्या या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश होणार आहे. युनेस्को चे पथक 4 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यानंतर सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहे. हा दौरा दोन दिवसाचा असणार आहे. यामध्ये विविध देशातील तज्ञ, अधिकार्यांची टीम तसेच राज्य व जिल्हा समितीचे सदस्य यांचा समावेश आहे. समितीच्या वतीने गडावरील स्वच्छता व्यवस्थापन, किल्ल्यावरील मुख्य दरवाजा, चोर वाटा, मशाल महोत्सव तसेच सुशोभीकरणाची कामे आणि किल्ल्यावर वेगवेगळ्या स्थानी असणार्या सात पॉईंट्सची पाहणी करणार असून या दौर्याच्या संदर्भाने जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाला त्या पद्धतीच्या सूचना केल्या आहेत.
युनेस्कोने वारसा स्थळांची यादी प्रतापगडाचा समावेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची नव्याने जगाला ओळख होईल. युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन केले तरी इतिहासातील नवे दुवे सापडू शकतील, अशी माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे. किल्ले प्रतापगडाची पाणी झाल्यानंतर युनेस्कोची टीम सातार्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देणार आहे. येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची ते पाहणी करणार आहेत. युनेस्को ची टीम 25 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून त्यांचा प्रत्यक्ष दौरा 27 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. पहिल्या दोन दिवसात पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली जाणार आहे.
युनेस्को चे पथक 4 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हा दौर्यावर
शिवपराक्रमाचा साक्षीदार असणार्या प्रतापगडाची होणार पाहणी; शिवाजी संग्रहालयाला देणार भेट
by Team Satara Today | published on : 25 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा