परताव्याच्या आमिषाने सुमारे 11 कोटींची फसवणूक

दोन जणांविरोधात गुन्हा

सातारा : अधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान विकास बबन सस्ते रा. निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा यांना शेअर मार्केट व शासकीय योजनांमध्ये रक्कम लावून तुम्हाला पंधरा टक्के दराने परतावा देतो, असे आमिष दाखवून अरुणा जगन्नाथ शिंदे आणि राहुल कृष्णात जाधव दोघे रा. पिंपरी चिंचवड, पुणे यांनी 11 कोटी 5 लाख 8% हजार 947 रुपये घेऊन सस्ते यांची आर्थिक फसवणूक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.


मागील बातमी
सोनगीरवाडी खून प्रकरणातील संशयित केवळ तीन तासांत जेरबंद
पुढील बातमी
सरपंच महिलेला मारहाण

संबंधित बातम्या