सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे राहत्या घरी गळफास घेतल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 13) घडली. अभी जगन बडेकर (वय 21, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अभी बडेकर याने मंगळवारी सायंकाळी 6.10 वाजण्यापूर्वी राहत्या घरी गळफास घेतला. नातेवाइकांनी त्याला खासगी रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. शाहूपुरी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी युवकावर कारवाई; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
सोयाबीन व खरीप पिकांचे अवशेष न जाळता चारा निर्मिती करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील; जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात टंचाई आढावा बैठक

संबंधित बातम्या