जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना मोक्का लावा

राष्ट्रीय समाज पक्षाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 28 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना तात्काळ मोक्का लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सादर करण्यात आले आहे.

या निवेदन सादरीकरणाच्या वेळी पक्षाचे सदस्य भाऊसाहेब वाघ, उमेश चव्हाण, डॉ. रमाकांत साठे, रघुनाथ सकट, संदीप माने, सविता कणसे, विमलताई शिंदे इत्यादी उपस्थित होते. 

निवेदनात नमूद आहे की, सातारा जिल्ह्यातील घरफोड्या, मारामारी, दरोडे, महिला अत्याचार यासारखे गंभीर गुन्हे सातार्‍यात घडत आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाला दोन चाकी, चार चाकी वाहने, दामिनी पथक, निर्भया पथक, पीसीआर अशा विविध सोयी दिलेल्या आहेत. तरीपण वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य लोक असुरक्षित असल्याची भावना आहे. आपणाला यापूर्वी निवेदन देण्यात आले आहे तरी या निवेदनाचा विचार काम केल्याने झाला नाही. दामिनी पथक व निर्भया पथक सक्रिय दिसत नाही. अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याच्यावरती 307 सारखा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, तो करण्यात आला नाही. 

अशा गंभीर घटना सातारा जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे अट्टल गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी उमेश चव्हाण व रमाकांत साठे यांनी केली. पारधी समाजातील काही आरोपींना अटक करून नसलेले गुन्हे टाकून बदनाम केले जाते. सोनार-सराफ यांच्याकडून रिकवरी घेऊन खोटे गुन्हे टाकले जातात. ज्या पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेलेला आहे, अशांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सहकारातून जावली तालुक्याचा कायापालट होईल
पुढील बातमी
जिल्ह्यातील हिमोफिलियाचे रुग्ण मोफत उपचारां अभावी वार्‍यावर; फॅक्टर 8 व 9 औषधांचा तुटवडा

संबंधित बातम्या