पॉवरहाउस परिसरात किरकोळ कारणावरून एकाला लोखंडी छन्नीने मारहाण; एकाविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 09 October 2026


सातारा : शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, किरकोळ कारणावरून पॉवरहाउस परिसरात वसंत जगन्नाथ पवार यांना लोखंडी छन्नीने मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ जगन्नाथ चव्हाण (रा. पॉवरहाउस) असे संशयिताचे नाव आहे. हवालदार बाबर तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मध्यवस्तीतील सराफी दुकानावर चोरट्यांचा डल्ला; 9 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
पुढील बातमी
जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम; जलप्रवाह सुरळीत होण्यासह पाण्याची बचत; शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्यास मदत

संबंधित बातम्या