महामार्गावर लूटमार करणारे जेरबंद

सातारा शहर पोलिसांची कारवाई; संशयितांमध्ये दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश

by Team Satara Today | published on : 26 February 2025


सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर संभाजीनगर शिवराज पेट्रोल पंपाच्या परिसरात लुटमार करणार्‍या तिघांना सातारा शहर पोलिसांनी पेट्रोलिंग च्या दरम्यान अटक केली आहे.

जीवन महादेव गायकवाड वय 20 राहणार प्रतापसिंह नगर याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सातारा शहरातील शिवराज पेट्रोल पंप येथे एकजण पुणे येथून बेळगावकरिता जाण्यासाठी खाजगी वाहनाने उतरला होता. सातारा येथून दुसर्‍या वाहनाने पुढील प्रवासासाठी चौकशी करण्याकरता तो जात असताना मोटरसायकल वरील तीन युवकांनी सातारा एसटी स्टँड जवळ सोडतो, असे सांगत त्याला निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये काढून घेतले होते. या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रात्रगस्तीच्या दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता तिसर्‍या इसमाला अटक करण्यात आली. या लुटमारीतील मोबाईल व रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.

 या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, दीपक ताटे, विठ्ठल सुरवसे, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उंब्रजच्या जखमी नीलमची अमेरिकेत काळाशी झुंज
पुढील बातमी
वाई येथील घरफोडीचा पोलिसांकडून पर्दाफाश

संबंधित बातम्या