सातारा : येथील कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथील इंग्रजी विभाग प्रमुख व आय. क्यू. ए. सी कॉर्डिनेटर सहाय्यक प्राध्यापक प्रकाश दशरथराव कांबळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर डॉ. अरविंद नवले, माजी प्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय उदगीर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा. डॉ. शीतलबाबू तायडे, अमरावती यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. या मौखिक परीक्षेसाठी चेअरपर्सन म्हणून प्रा. डॉ. दिलीप चव्हाण, संचालक, भाषा संकुल,स्वामी रामानंद तीर्थ मराठा विद्यापीठ, नांदेड हे उपस्थित होते. त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील अतिउच्च पदवी मिळाल्यामुळे राज्याचे माजी अल्पसंख्यांक सचिव मा. आर. के. गायकवाड (भा. प्र. से) यांनी सुद्धा अभिनंदन केले.
त्यांच्या या यशाबद्दल सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन श्री. जयेंद्रदादा चव्हाण व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.