सातारा : खोडद, ता. सातारा येथे अवैध दारू प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडद येथे रस्त्याकडेच्या एका पानटपरीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या ४१ बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच याप्रकरणी तानाजी नानासो बागल (रा. हरपळवाडी, ता. कराड) याला नोटीस बजावली आहे.