04:51pm | Nov 26, 2024 |
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर राज्यात नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे. महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील २ कोटी ४० लाख बहिणींच्या खात्यावर १५०० रुपये दिले जात आहे. आता महायुतीने ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचे निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे. राज्यात ज्या २ कोटी ४० लाख बहिणींना ही रक्कम मिळत आहे, त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ २२ टक्केच महिला या योजनेस पात्र आहे, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. सांगलीत माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी हा दावा केला.
लाडक्या बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली. ते म्हणाले, शासनाच्या नव्या आध्यादेशात अनेक नियम लावलेले आहेत. हे नवे नियम पाहता केवळ २२ टक्के बहिणी पात्र ठरतील. मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निकष लावून आवडते आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव केला जात आहे. तसेच सर्वच लाडक्या बहिणीला 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.
विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिलेली आहेत, असा दावा सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही. दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा काढून घ्यायची, हे तुम्हाला शोभत नाही. त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.
महायुतीचे नेते हे एक वचनी रामाचे भक्त आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले, भगवान रामाने कधीही वचन मोडलेले नव्हते. तेव्हा आता सत्ता आलेली आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |