काशीळ येथे महामार्ग ओलांडताना कारची बापलेकाला धडक; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू; ३१ जानेवारी रोजी झाला होता अपघात

by Team Satara Today | published on : 03 February 2026


सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना काशीळ (ता. सातारा) येथे बापलेकाला भरधाव कारने जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला. हा अपघात ३१ जानेवारी रोजी सायंकाळी झाला होता. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वडील संतोष पवार यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

संतोष शंकर पवार (वय ३९, रा. म्हावशी, ता. पाटण, सध्या रा. शिवराजगनर, काशीळ, ता. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत राज संतोष पवार (१३, रा. म्हावशी, ता. पाटण) याने बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राज व त्याचे वडील काशीळ येथे सायंकाळी सात वाजता महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी कराड बाजूकडून भरधाव आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच. १२, एफयू. ७३९९) दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वडील संतोष पवार यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माजगावकर माळ शाहूपुरी येथे घरफोडी; ६७,४०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास
पुढील बातमी
शिक्षणात कोल्हापूर महानगरपालिकेचा ‘शाहू पॅटर्न’ राज्यात अव्वल; स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी एकमेव महानगरपालिका

संबंधित बातम्या