सातारा : ऊस उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा आणि उसाला न्याय्य दर मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 19) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. ऊसदराच्या प्रश्नावर शेतकर्यांची भूमिका आक्रमक होत असून, या आंदोलनातून शासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर जाधव, युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, अनिल बाबर, देवदास जाधव यांनी सहभाग घेतला
ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, शेतीमधील विविध निविष्ठांच्या दरवाढीमुळे शेतकर्यांवर वाढणारा आर्थिक भार आणि उसाला मिळणारा दर यांचा विचार करून योग्य दर निश्चित करावा, अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेने घेतली आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर रयत क्रांतीचे सातार्यात आंदोलन; शासन आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
by Team Satara Today | published on : 19 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा