सैदापूर येथील हॉटेल नीतीराज ढाब्याजवळ अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकावर गुन्हा; दोघे जखमी

by Team Satara Today | published on : 14 July 2026


सातारा : अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सैदापूर येथील हॉटेल नीतीराज ढाब्याजवळ (कार क्र. एमएच 02 एक्यू 7603) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार धोकादायक पद्धतीने, भरधाव वेगाने चालवून सुनील दिलीप निकम (रा. आंबेदरे, ता. सातारा) हे चालवीत असलेल्या मोटरसायकल (क्र. एमएच 11 सीयु 0304) या दुचाकीला जोरदार धडक दिली. 

या धडकेत सुनील निकम यांच्यासह त्यांचा मित्र विठ्ठल हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रेळेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू

संबंधित बातम्या