जिल्हा रुग्णालयातील गैरसुविधांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार

दलित महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि सुविधा याबाबत प्रचंड अनास्था आहे. येथील प्रसाधनगृहांची बरेच दिवस स्वच्छता होत नाही. रुग्णांची बेडशीटे दोन-दोन दिवस बदलली जात नाहीत. तसेच तंत्र सुविधांच्या बाबतीतही गोंधळ आहे, अशी तक्रार दलित महासंघ पारधी हक्क अभियानाच्या जिल्हा उपाध्यक्षा उज्वला सुतार यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनावर प्रताप पेरते, सुरेखा डुबल, शितल गायकवाड, सुचिता मोहिते, अंकुश बत्रे, सुहास सपकाळ, पंकज दीक्षित, विवेक ताटे, विनायक माळी, प्रवीण भोसले यांच्या स्वाक्षरी आहेत.

या निवेदनात तक्रार करण्यात आली आहे की, जिल्हा रुग्णालयाचे नाव नावालाच क्रांतीसिंह नाना पाटील असे आहे. मात्र सेवा सुविधा तंत्र सुविधा याबाबत कुठेही येथे क्रांती दिसून येत नाही. निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर खाडे यांचे कुठेही काम दिसून येत नाही. येथे स्वच्छतेच्या बाबतीत प्रचंड अनास्था आहे. शासन आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र जिल्हा रुग्णालयात कर्मचार्‍यांचा अभाव आहे. येथे नीट स्वच्छता होत नाही. येथील रुग्णांची बेडशीट दोन-दोन दिवस बदलली जात नाहीत.

 सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, डायलिसिस, मशीन येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन देत सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नात लक्ष घालून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



मागील बातमी
वेतन करारावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हा बँकेला इशारा
पुढील बातमी
सातारा डेमोक्रॅटिकचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

संबंधित बातम्या