सातारा एमआयडीसी मध्ये लूटमार करणारे पाच जणांचे टोळके पोलिसांच्या ताब्यात.

by Team Satara Today | published on : 20 August 2024


सातारा दिनांक २० प्रतिनिधी 

सातारा एमआयडीसी परिसरात ट्रकचालक, कामगार यांना लुबाडून पसार होणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्काळ अटक केली आहे लुटमारीच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात संबंधितांना ताब्यात घेण्यात आल्याने या धडक कारवाईचे सातारा एमआयडीसीच्या व्यवसायिकांकडून कौतुक केले जात आहे .

निखिल सुनील बोभाटे वय 21, महफूज सलीम इनामदार वय 23, संकेत विजय खंडझोडे वय 22, ओंकार सचिन लोंढे वय 18,अविष्कार अण्णा बोभाटे वय 19 सर्वजण राहणार निगडी पवाराची असे संबंधित लूटमार करणाऱ्यांची नावे आहेत दिनांक 18 जून रोजी सातारा एमआयडीसी परिसरात परप्रांतीय कामगार तसेच ट्रक चालक यांना अनोळखी युवकांच्या टोळक्याने ठिकठिकाणी अडवून पैशाची मागणी केली पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबधितांना गंभीर जखमी करण्यात येऊन त्यांच्याकडील पैसे काढून घेण्यात आले याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी शोध मोहीम राबविली. या युवकांची माहिती घेत असताना एक संशयिताचे माहिती पोलिसांना प्राप्त झाली. सदर संशयित एका हॉटेल समोरून जात असताना पोलिसांना दिसला त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला हिसका दाखवल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा साथीदारांमार्फत केल्याचे सांगितले साथीदारांची माहिती व वर्णन प्राप्त करून पोलिसांनी संबंधितांचा ठाव ठिकाण शोधून काढला अवघ्या दोन तासांमध्ये लूटमार करणारी पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. हे सर्व संशयित युवक पवाराची निगडी परिसरातील आहे या टोळक्याने वेगवेगळ्या लूटमार प्रकरणांमध्ये एक लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरला होता .तीन मोबाईल दोन मोटरसायकल या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुधीर भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलांनी, संतोष घाडगे, सागर गायकवाड ,विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी भाग घेतला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन
पुढील बातमी
जबरी चोरी प्रकरणी पाच अज्ञातांवर गुन्हा

संबंधित बातम्या