शेतमजूरीच्या कारणातून एकाचा खून ; दोन महिलांसह आठ जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 May 2026


सातारा : शेतमजुरीच्या कारणातून एकाचा खून केल्याप्रकरणी दोन महिलांसह आठ जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सविता आगतराव जाधव राहणार आर्डे, ता. जावली यांनी दिनांक 19 रोजी अश्विनी दीपक जाधव आणि सुनीता विलास जाधव यांच्याकडे शेतमजुरीचे पैसे मागितले. त्यावेळी संबंधितांनी सुनीता जाधव यांना शिवीगाळ, दमदाटी केली होती. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली होती.

या भांडणाचा राग मनात धरून त्याच दिवशी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास रोहिदास ज्ञानेश्वर जाधव, ऋतिक प्रकाश जाधव, आदिनाथ तुकाराम जाधव, अलंकार विलास जाधव, ओंकार विलास जाधव, विलास शामराव जाधव (सर्व रा. आर्डे, ता. जावली) यांनी सविता जाधव यांच्या घरात घुसून काठी, कुऱ्हाडीने त्यांचे पती आगतराव बाबुराव जाधव (वय 57) यांच्यावर हल्ला केला. कुऱ्हाडीचा घाव वर्मी बसल्याने आगतराव जाधव यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यशवंत बँकेचा परवाना रद्द; ११२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

संबंधित बातम्या