न्यू इंग्लिश स्कूल साताराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

by Team Satara Today | published on : 26 September 2024


सातारा : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, ची न्यू इंग्लिश स्कूल सातारा ही शाळा सध्या शतकोत्तर रौप्य  महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्त पालक-शिक्षक संघ व माऊली ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या गणेश सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष  अमित कुलकर्णी, सातारचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, माऊली ब्लड सेंटरचे अजित कुबेर, डॉ.रमण भट्टड, डॉ. गिरीश पेंढारकर,  माधव प्रभुणे, शाला समिती सदस्य सारंग कोल्हापुरे, माजी शिक्षक र.मा. पवार, माजी विद्यार्थी विजय पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या शालाप्रमुख सुजाता पाटील, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.अवंती ठोंबरे, सचिव श्रीनिवास कल्याणकर, सहसचिव सौ.शिल्पा कारले यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून संपन्न झाला.

यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे म्हणाले की, संस्थेच्या वतीने शाळेचे विविध उपक्रम साजरे होत असताना, सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून आयोजित केलेले रक्तदान शिबिर हे खरोखरच गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणारे आहे. शाळेच्या विविध उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो.

यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा होत असताना, संस्थेच्या वतीने शाळेच्या विविध माजी विद्यार्थ्यांचे योगदान घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून असेच हे उपक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत असे सांगितले.

रक्तदान शिबिरामध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या विविध क्षेत्रात सध्या आपले कार्य विस्तार करणाऱ्या माजी विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग देऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा प्रमुख सौ.सुजाता पाटील यांनी केले व सूत्रसंचालन श्रीमती. महाडिक मॅडम यांनी केले. योगीराज वारले यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  उपशालाप्रमुख श्रीमती. विनया कुलकर्णी,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगीराज वारले, पर्यवेक्षक राजेश सातपुते, जनार्दन नाईक, अनिता कदम, महेश भुते, जुबेर आतार, योगीराज वारले, तुषार कुलकर्णी, विनायक काकडे, अमित मोरबाळे यांनी तसेच शाळेच्या शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना शाळेच्या वतीने आभार पत्र व माऊली ब्लड सेंटरच्या वतीने प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी बांधवांची एकजुट दिसेल : हेमंत पाटील
पुढील बातमी
प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्याचे शासनाचे आदेश

संबंधित बातम्या