सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गोडोली येथे ताबीज तोफिक शेख (रा. गुरुवार पेठ, पुणे) आणि साद आयाज बागवान (रा. सोमवार पेठ, सातारा) यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल रस्त्याच्या मधोमध लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करून आरडाओरडा करीत सार्वजनिक शांततेचा भंग केला. याप्रकरणी संबंधितांनी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.