सातारा : समर्थ गाव, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने डंपरची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ते 22 दरम्यान दीपक माणिकराव सातपुते रा. समर्थ गाव, ता. सातारा यांचा नऊ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा डंपर क्र. एमएच 1140 सीएम 4835 अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार दबडे पाटील करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा