सातारा : आर्थिक विवंचनेतून एका महिलेने आत्महत्या केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरातील आर्थिक विवंचनेतून शितल मिथुन शेलार (रा. खेड, ता. सातारा) या विवाहितेने एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.