08:57pm | Oct 04, 2024 |
सातारा : भाजपचे माजी आमदार महेश टिळेकर यांच्या संकल्पनेतील हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातार्यामध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. येथील शिवतीर्थावर फटाक्यांची आतषबाजी करून फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत झाले. शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. दरम्यान बहुजन समाजातील अनेक वंचित घटकांचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता या सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी आमदार महेश टिळेकर यांनी सांगितले.
टिळेकर यांनी सातार्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, अविनाश कदम, आप्पा कोरे, मनीष महाडवाले, गौरी गुरव, अनिता बोडस, राजू भोसले इत्यादी उपस्थित होते.
महेश टिळेकर या यात्रे संदर्भात बोलताना पुढे म्हणाले, या यात्रेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक असणार्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथून सुरू झाली. वाई येथे पदाधिकार्यांच्या गाठीभेटी घेऊन आम्ही आता सातार्यात आलो आहोत. सातार्यातही आम्ही भाजपच्या निवडक पदाधिकार्यांशी संवाद साधत आहोत. या सन्मान यात्रेद्वारे बहुजनांचा सन्मान प्राप्त करून देणे हा मुख्य हेतू आहे. आजच्या राजकीय जीवनामध्ये जाती-जातींमध्ये भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरू आहे. मात्र महायुती सरकारने सर्वसामान्यांचा सन्मान करणे सुरू ठेवले आहे. सोनार समाजासाठी महामंडळ, इतर समाजासाठी महामंडळ तसेच ओबीसी समाजासाठी सुद्धा महामंडळाची स्थापना करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सन्मान यात्रा कोणत्याही राजकीय हेतूने नाही, तर अठरापगड जाती आणि गाव गाड्यांमध्ये महत्त्वाचा घटक असणार्या सर्व बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणे, हा या मागचा हेतू आहे.
विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी सरकारच्या काही निर्णयाविरोधात आंदोलन केले. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. सरकारचे काही निर्णय जर त्यांना पटले नसतील तर ते या संदर्भात दाद मागू शकतात. पक्षश्रेष्ठींकडून त्यांना त्या संदर्भात योग्य ती माहिती देऊन त्यांचे समाधान केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |