सातारा : मद्याचे सेवन केल्याप्रकरणी बस वाहका विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी स्टँड बस स्थानक परिसरात शिराळा आगाराच्या बस वरील वाहक संदीप नरसिंग गायकवाड हे सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यावर असताना दारू पिल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.