बनावट मालाचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 June 2025


सातारा : बनावट मालाचा साठा केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरुद्दीन अहमद रजा खान रा. गार्डन सिटी, राधिका रोड, सातारा यांनी त्यांच्या गोडोली ते अजंठा चौक जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या एस प्लॅस्टर दुकानात एका कंपनीचा लोगो, नाव, डिझाईन पॅटर्न कॉपी करून बनावट पट्ट्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केलेला दि. 18 रोजी दिसून आला. याबाबत साजिद असगर अली अन्सारी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो
पुढील बातमी
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या