सातारा : सदर बाजार आंबेडकर झोपडपट्टी येथे झालेल्या मारहाणी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करण लादे, सुश्रित तानाजी सावंत, गोट्या पवार, अविनाश कुंदन पवार यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या चौघांनी शेख यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलीस हवालदार देशमुख अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अविनाश कुंदन पवार वय 26 यांनी अश्रफ असलम शेख यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. दिनांक 31 जुलै रोजी रात्री नऊ वाजताशेख यांनी फिर्यादीला दारू पिण्यास पैसे मागितले. त्याला नकार देण्याच्या कारणावरून शेख यांनी पवार यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याची फिर्याद देण्यात आली आहे.