उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामध्ये फळे, भाज्या, ताक, दही, नारळ पाणी इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. उन्हाळ्यात शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी लिंबू पाणी किंवा इतर पेयांचे सेवन केले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी थंडगार स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा मोजितो प्यायला जातो. मात्र किंमतीने महाग असलेले मोजितो पिण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये मोजितो बनवावा. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
स्ट्रॉबेरीचे तुकडे
बर्फाचे तुकडे
लिंबाचे तुकडे
पुदिन्याची पाने
पिठीसाखर
सोडा
कृती:
स्ट्रॉबेरी मोजितो बनवण्यासाठी सर्वप्रथम, काचेच्या ग्लास स्ट्रॉबेरीचे तुकडे, लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका.
त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित कुसकरून करून घ्या. यासाठी तुम्ही मोठ्या चमच्याचा वापर करू शकता.
नंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि पिठीसाखर घालून पुन्हा एकदा मिक्स करा.
साखर मिक्स झाल्यानंतर त्यात पुन्हा एकदा स्ट्रॉबेरीचे बारीक तुकडे आणि पुदिन्याची पाने टाकून वरून सोडा टाकून मिक्स करून घ्या.
मोजितो सर्व्ह करताना सगळ्यात शेवटी वरून स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून मोजितो सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला स्ट्रॉबेरी मोजितो.