विवाहित महिलेच्या जाचहाटप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल; सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 02 April 2026


सातारा  :  गुरुवार पेठ येथे राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहित महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,याप्रकरणी सायली रोहित साठे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रोहित लक्ष्मण साठे, मनीषा लक्ष्मण साठे, महादेव लक्ष्मण साठे, पौर्णिमा सागर भिसे, गायत्री संदीप लोंढे (सर्व रा. राजनगर सांगली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सर्व संशयितांनी मार्च २०२४ पासून आतापर्यंत राजनगर सांगली व गुरुवार पेठ सातारा येथे विवाहितेला २ तोळे सोन्याची चेन दिल्याच्या कारणावरून हाताने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करत शारीरिक मानसिक त्रास देऊन जाचहाट केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सर्वांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सपकाळ करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात अजंठा चौकात अवैध देशी दारूच्या विक्रीप्रकरणी बाटल्या जप्त
पुढील बातमी
पाटखळ माथा येथे बंद असलेल्या पोल्ट्रीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा

संबंधित बातम्या