कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी मिळणार अनुदान

by Team Satara Today | published on : 02 December 2025


सातारा :  राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवुन ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या थाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. व्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

 राज्यात कांदा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवुन ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या थाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. व्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

 यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये कमी खचचि कांदाचाळ लसूण साठवणूक गृह हा घटक राबविण्यात येत असून ५ ते २५ मे. टन, २५-५०० मे. टन व ५००-१००० मे. टन क्षमतेच्या कांदा चाळी/लसूग साठवणूक गृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान अनुज्ञेय आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी  दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गौण वनोपजांकरिता वाहतूक परवानाबाबत कार्यपद्धती निश्चित; शासन निर्णय 27 नाव्हेंबर रोजी पारित
पुढील बातमी
कला व वाणिज्य महाविद्यालयात एड्स दिनानिमित्त जागरूकता अभियान

संबंधित बातम्या