महात्मा जोतीराव फुलेंच्या क्रांतिकारक विचारावर साताऱ्यात २८ नोव्हेंबरपासून संबोधी व्याख्यानमाला; महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंत, साहित्यिकांची भाषणे होणार

by Team Satara Today | published on : 26 October 2026


सातारा  : क्रांतिकारक युगकर्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षा निमित्त   संबोधी प्रतिष्ठानची ४०व्या वर्षाची थोरांच्या स्मृती- व्याख्यानमाला फुलेंच्या  क्रांतिकारक विचाराच्या मंथनावर  त्यांच्या स्मृती दिनापासून सुरु  होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष रमेश इंजे व निमंत्रक दिनकर झिंब्रे  यांनी दिली.
नगरवाचनालयाच्या पाठक हाॅल मध्ये  ही व्याख्यानमाला  २८ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत होणार असून व्याख्यानमालेचे उद्घाटन व मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्काराचे वितरण महात्मा फुले स्मृती दिनी शनिवारी २८नोव्हेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे.
या व्याख्यानमालेत  महाराष्ट्रातील मान्यवर विचारवंत,साहित्यिकांची भाषणे होणार आहेत. त्यामध्ये रविवारी २९ नोव्हेंबर रोजी  'महात्मा फुलेंचा  शेतकऱ्याचा असूड ' विषयावर डॉ. जगदिश सोनवणे  (अहिल्यानगर ), सोमवार ३० नोव्हेंबर ' सत्यशोधक चळवळ काल व आज '-  डॉ. श्रद्धा कुंभोजकर ( पुणे), मंगळवार १ डिसेंबर' महात्मा फुले व स्त्री -पुरुष समता'  - डॉ. सोनिया कस्तुरे  (सांगली), गुरुवार ३ डिसेंबर ' महात्मा फुलेंची धर्मचिकित्सा ' -डॉ. विश्वनाथ शिंदे ( पुणे), शुक्रवार ४ डिसेंबर ' महात्मा फुलेंचा शिक्षण विचार '- प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार ( लातूर), शनिवार ५ डिसेंबर ' भारतीय वर्तमान वास्तवात महात्मा फुले समजून घेताना ' - डॉ. मिलिंद कसबे  (नारायणगाव)
या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे, असे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ,सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव, अतिरिक्त सहकार्यवाह अशोक भोसले,कोषाध्यक्ष यशपाल  बनसोडे, विश्वस्त  डॉ. जयपाल सावंत, अनिल बनसोडे, केशवराव कदम, अशोक कांबळे, प्रकाश गायकवाड  यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निनाम येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद

संबंधित बातम्या