सातारा : पोलिस अधीक्षक यांच्या सातारा तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शाहूपूरी येथील एकावर शाहूपूरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. प्रेम आबासाहेब अडागळे असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. प्रेम अडागळे याला दि. २३ जानेवारी २०२६ ला सातारा तडीपार आदेश असतानाही तो दि. १३ रोजी शाहूपूरी येथील रहात्या घरी आडळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. पो. कॉ. रविशंकर मारबदे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली असून पो. हवालदार कदम हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत
तडीपार आदेश भंग केल्याप्रकरणी शाहूपूरी येथील एकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 15 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा