सातारा : सातारा तालुक्यासह शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचे अपहरण झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 23 वर्षीय विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत, एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
सातारा तालुक्यासह शहर परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचे अपहरण
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा