सातारा : सातारा शहर पोलिसांनी गुरुवार परज आणि एसटी स्टँड शेजारील चांद मस्जिदच्या टपरीच्या आडोशाला जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी सुरज राजेंद्र फडतरे (वय २९, रा. देशमुखनगर, खोजेवाडी,सातारा) आणि महेसर मेहबूब खान (वय ६५ रा.गुरुवार पेठ,सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. छाप्यात एकूण १६६० किमतीची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
सातारा शहर पोलिसांची गुरुवार परज आणि एसटी स्टँड शेजारी जुगार अड्ड्यावर कारवाई
by Team Satara Today | published on : 19 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा