सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच मदत केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर सातार्यातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट रस्त्यावर असलेल्या लॉजमध्ये अत्याचार झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित गेल्या दोन वर्षापासून मुलीची छेड काढून त्रास देत होता. दरम्यान, मुख्य संशयिताला सहकार्य केल्याप्रकरणी दोन मित्रांवरही गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.