श्लोक घोरपडे मोटोक्रॉस स्पर्धेत दोन्ही राऊंडमध्ये बेस्ट रायडर ट्रॉफीचा मानकरी

by Team Satara Today | published on : 26 August 2024


सातारा  : येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटी के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी शिकणाऱ्या श्लोक विक्रम घोरपडेने आपल्या एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप  रेसिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची शृंखला कायम ठेवली आहे.

श्लोक हा सातारा येथील सुप्रसिद्ध उद्योजक विक्रम घोरपडे व शानभाग विद्यालयाच्या संचालिका सौ.आँचल घोरपडे यांचा चिरंजीव आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या गुजरात मधील बडोदा स्पर्धेमध्ये श्लोक ने एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप स्पर्धेत बेस्ट रायडर ट्रॉफी चा बहुमान पटकावला आहे. 

अतिशय धुवाधार पाऊस आणि प्रचंड चिखल यामध्ये अक्षरशः या ट्रॅकवरून दुचाकी गाडी चालवणे म्हणजे खरोखरच दिव्य होते. मात्र हे चॅलेंज त्याने स्वीकारत श्लोकने अतिशय हुशारीने आपल्या या खेळातील चुणूक आणि केलेली तपश्चर्येचे साध्यंत उदाहरण उपस्थितांना दाखवत या दोन्ही मोटो क्रॉस स्पर्धा यशस्वीपणे आणि सहजरीत्या विजयी केल्या. या स्पर्धेत दोन्ही राऊंडमध्ये त्याने विशेष यश मिळवून एम आर एफ नॅशनल डर्टी ट्रॅक स्पर्धेचे विजेते पद मिळवले. श्लोकला भव्य  2 ट्रॉफीने गौरविण्यात आले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग संस्थेच्या संचालिका सौ.आँचल घोरपडे, विश्वस्त सौ.उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभागप्रमुख अभिजीत मगर, पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक शिक्षकांसह, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळांमध्ये, महिलांकडे आता पॅनिक बटण येणार? 
पुढील बातमी
अंतरिक्ष शास्त्रज्ञ दि. ३१ ऑगस्टला साताऱ्यात

संबंधित बातम्या