सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात वारकर्यांसाठी इंदापूर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिराचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. डॉ. पल्लवी साठे पाटोळे व डॉ. यश शिंदे यांनी वारकर्यांची तपासणी करून त्यांना योग्य तो उपचार व औषधे दिली. हजारो वारकर्यांनी याचा लाभ घेतला.
या मोफत आरोग्य शिबिराला हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज, हभप डॉ. सुहास महाराज फडतरे, देहू येथील तुकाराम महाराजांचे वंशज व देहू येथील संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, ह भ प भरत घोगरे गुरुजी या आदींनी शिबिरस्थळी भेट देऊन उपक्रमाचे स्वागत केले व वारकर्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे, असे आवर्जून सांगितले. वारकरी संतांचा समतेचा विचार हा पुढे घेऊन जाण्याचे काम विद्रोही सांस्कृतिक चळवळ करत असल्याचेही या सर्वांनी आवर्जून सांगितले.
सुरुवातीपासून सातत्याने या उपक्रमाला मदत करत असलेले इंदापूरचे राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्मृतीशेष सलीम शेख यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या आठवणीचा व त्यांच्या सहभागाची क्षणचित्रे असलेले फलक शिबीर स्थळी लावण्यात आले होते.
शिबिर आयोजित करण्यासाठी इंदापूर येथील रमेश शिंदे, संदिपान कडवळे, सिध्दार्थ मखरे, अक्षय यादव, संजय डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी विशेष सहकार्य केले.
हे आरोग्य शिबिर आयोजन आयोजित करण्यासाठी सातारा येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते विजय मांडके, शिवराम ठवरे, युवराज जाधव, महेश गुरव, शुभम ढाले, रश्मी लोटेकर, हर्षदा पिंपळे, संकेत माने, संकेत जाधव, अस्तीका आगाशे, निकिता सावंत, स्वप्नाली भोसले, रोहित क्षिरसागर, ऋषिकेश तोडके, राजकुमार चव्हाण, रेश्मा सकटे, राजकुमार चव्हाण, सादिका बागवान, अय्याज मुलाणी, विशाल साळुंखे, श्रुती माने, सुवर्णा गुरव, सुर्यकांत होवाळ, शकुंतला मांडके आदींनी परिश्रम घेतले.
सातारा येथील कर्म प्रतिष्ठानच्या संस्थापिका व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना देशमुख, डॉ सुहास पोळ, वैद्यकीय प्रतिनिधी, धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ महेश जाधव, शिरवळ येथील वरद एजन्सी चे सचिन खोपडे, सातारचे किरण चोरगे यांनी औषधांसाठी सहकार्य केले.