शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावेत - जिल्हाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 22 November 2025


सातारा   : शाहीर पदमश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाने तातडीने तयार करुन ते शासनाकडे सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

मौजे पसरणी ता. वाई येथे शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, शाहीर साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासो निकम, मुख्य विश्वस्त माई साबळे, विश्वस्त दत्ता मर्ढेकर, श्रीधर जगताप आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बांधण्यात येणाऱ्या स्मारकाची माहिती घेतली. स्मारकाचा आराखडा अत्यंत चांगला झाला असून या आराखड्यानुसार मंजुरीचे प्रस्ताव सादर करावेत. शाहीर साबळे यांच्या स्मारकासाठी विविध इमारतींचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. ही कामे शाहीर साबळे यांच्या नावाला साजेसी अशी करावीत.

स्मारकात विविध इमारतींचे बांधकाम होणार आहे यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची तरतुद करावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, शाहीर साबळे यांच्या जन्म गावी हे स्मारक होत आहे याचा आनंद होत आहे. या स्मारकाच्या विविध परवानग्या व मंजुरीचे प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाळेत आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही सर्व घटकांची जबाबदारी-जिल्हाधकिारी संतोष पाटील; राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्यशाळा संपन्न
पुढील बातमी
कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. प्रकाश कांबळे यांना पीएचडी प्रदान

संबंधित बातम्या