सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात द कास अल्ट्रा रनचे प्रतिनिधी यांनी बेकायदेशीर साउंड लावून उल्लंघन केले. याप्रकरणी शिव तुळशीदास यादव (रा.खिंडवाडी ता.सातारा) याच्यावर व द कास अल्ट्रा रनचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस धनंजय कुंभार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई दि. 12 एप्रिल रोजी करण्यात आली आहे.