आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही आजाराच्या जनजागृतीसाठी बाईक रॅली

by Team Satara Today | published on : 13 August 2025


सातारा : आंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर बाईक रॅलीचे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते त्या रॅलीचा शुभारंभ  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे   अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले यांच्यासह जिल्हा रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थिती होती. की युवक जागरूक असेल तर स्वतःसोबतच मित्र, मैत्रिणी, कुटुंबीय व समाजाला सुरक्षित ठेऊ शकतो. कायदयाची योग्य माहीती असणे व योग्य अंमलबजावणी करणे या मुले समाज सुरक्षित होतो. सामाजिक सुरक्षितता सुदृढ करण्यासाठी युवकानी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे   जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर कार्यक्रमा प्रसंगी सांगितले.

 तरूण हे समाजाचा कणा आहेत व त्यांचे विचार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. एचआयव्ही या आजाराचे अजुनही समुळ उच्चाटन झालेले नाही. युवकांनी जबाबदार वर्तन अवगत करून एचआयव्ही आजारापासून दूर राहावे आपले आरोग्य ही आपली जबाबदारी असून एचआयव्ही निर्मुलनामध्ये आरोग्य विभागासमवेत युवकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे या साठी युवकांनी एकत्रीत येऊन एचआयव्ही विरोधी लढा दिला पाहीजे व एचआयव्ही संसर्गितांना आधार दिला पाहीजे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांनी केले. वर्षीचे आंतराष्ट्रीय युवा दिनचे घोषवाक्य हे शास्वत विकासासाठी, युवा सक्षमीकरण असून युवकाना सक्षम करून एक चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी अणि शास्वत विकासासाठी योगदान देण्याकरीता शासन प्रयत्न कररत आहे व युवकानी एक जबाबदारी म्हणून एचआयव्ही/एड्स निर्मुलन कार्यक्रमामध्ये पुढाकार घ्यावा, असे प्रास्ताविकात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खाडे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कबुतरखाना बंदी समर्थनात मराठी एकीकरण समिती आक्रमक
पुढील बातमी
रजनीकांतच्या 'कुली' चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू

संबंधित बातम्या