सातारा : सातारा शहरातील मल्हारपेठ परिसरातील जगताप कॉलनी येथे असलेल्या शिंदे खानावळीच्या पोर्चमधील टेबलावर ठेवलेले चांदीचे दोन जोडवे आणि मोबाईल असा एकूण 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ऋतिक शशिकांत शिंदे (वय 27, रा. अमराई पार्क, करंजे, सातारा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.15 ते 11.45 या वेळेत जगताप कॉलनी, मल्हारपेठ येथील शिंदे खानावळीच्या पोर्चमध्ये टेबलावर चांदीचे दोन जोडवे आणि मोबाईल ठेवण्यात आला होता.
यावेळी अज्ञात चोरट्याने संधी साधून सुमारे 22 हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल लबाडीने चोरून नेला. याप्रकरणी दि. 24 नोव्हेंबर रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
मल्हारपेठ परिसरातील शिंदे खानावळीच्या पोर्चमधील टेबलावर ठेवलेले चांदीचे जोडवे, मोबाईल लंपास
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा