सातारा : सर्व समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा- जावली मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या विविध कब्रस्थान तसेच मस्जिद परिसरातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. मंजूर निधीतून सातारा शहरातील १२ आणि जावली तालुक्यातील ४ गावातील २० विकासकामे मार्गी लागणार असून ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ना. शिवेंद्रसिंहराजेंनी मुस्लिम बांधवांना अनोखे गिफ्ट दिले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकास विभागाचे मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडून हा निधी मंजूर करून घेतला आहे. निधी उपलब्ध केल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. भरणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. सातारा शहरातील गेंडामाळ नाका येथील कब्रस्थानमध्ये पाण्याची टाकी बांधणे २३.९८ लाख, संरक्षक भिंत बांधणे २४.९९ लाख, प्रवेशद्वार बांधणे २३.९७ लाख, अंतर्गत रस्ते करणेसाठी २४.९९ लाख, सुशोभीकरण करणे २३.९९ लाख, नमाज पठणासाठी शेड बांधणे २४.९८ लाख, कब्रस्थानमध्ये शेड बांधणे २४. ९८ लाख, विद्युतीकरण करणेसाठी २४.८७ लाख, जामा मस्जिद सदरबझार येथे कब्रस्थानमध्ये संरक्षक भिंत बांधणे २४.९८ लाख, विद्युतीकरण व काँक्रीटीकरण करणे २४.९९ लाख, आतारी कब्रस्थान करंजे तर्फ सातारा येथे विद्युतीकरण व काँक्रीटीकरण करणे २४ लाख, संरक्षक भिंत बांधणे २४.९७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
जावली तालुक्यातील कुडाळ येथील कब्रस्थानमध्ये वेटिंग शेड बांधणे ९.९८ लाख, ईदगाह शेड बांधणे १० लाख, ईदगाह बांधणे ९.९५ लाख, अंतर्गत रस्ता करणे ९.९६ लाख, संरक्षक भिंत बांधणे ९.९५ लाख, गेट बांधणे ९.९७ लाख, सुशोभीकरण करणे ९.९८ लाख, शौचालय बांधणे ९.९१ लाख, कब्रस्थानमध्ये दुरुस्ती करणे ९.९३ लाख, तार कंपाउंड करणे ९.९८ लाख, नमाज पठन शेड बांधणे ९.९९ लाख, मस्जिद परिसरात पत्राशेड बांधणे १० लाख, मस्जिद परिसरात सुशोभीकरण करणे ९.९१ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सरताळे येथील मस्जिद परिसरात संरक्षक भिंत बांधणे ९.९९ लाख, परिसरात सुशोभीकरण करणे ९.९८ लाख, रायगाव येथील मस्जिद परिसरात सुशोभीकरण करणे ९.९७ लाख, अंतर्गत रस्ता करणे ९.९८ लाख, परिसरात संरक्षक भिंत बांधणे ९.९८ लाख, मेढा येथील मस्जिद परिसरात सुशोभीकरण करणे (भाग १) १० लाख, मस्जिद परिसरात सुशोभीकरण करणे (भाग २) १३.९९ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुस्लिम समाजाने समाधान व्यक्त करून ना. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले आहेत.