सातारा : तालुक्यातील म्हसवे येथील १९ वर्षीय तरुणी घरातून न सांगता निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून, ती अद्याप परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल गणेश बोरडे (वय १९, रा. म्हसवे) ही युवती दि. २८ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यानंतर ती परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली; मात्र ती अद्याप सापडलेली नाही.
याप्रकरणी तिचे वडील गणेश वसंत बोरडे (वय ४१, रा. म्हसवे) यांनी पोलिसांत मिसिंगची फिर्याद दिली असून, बेपत्ता तरुणीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.