पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत समन्वय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

by Team Satara Today | published on : 09 October 2026


पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक ओम प्रकाश बकोरिया आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठीचे निवडणूक निरीक्षक डॉ. हनमनलू तुम्मोड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या उपस्थितीत निवडणूकीच्या अनुषंगाने समन्वय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कायालयात गुरुवारी (ता. ८) आयोजित बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध बाबींसाठीचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.
आचारसंहिता, निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका छपाई, माध्यम कक्ष कामकाज, मतमोजणी स्थळ व व्यवस्था, स्वीप कार्यक्रम, मतदार यादी व्यवस्थापन, तक्रार निवारण कक्ष आदी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
मतदान टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न स्वीप उपक्रमाद्वारे जनजागृती करून करावेत. त्यासाठी विविध माध्यमातून छोट्या- छोट्या ध्वनीचित्रफीती मतदारांपर्यंत पोहोचवाव्यात. मतदानाची पद्धती वेगळी असल्याने त्याबाबतही स्वीपअंतर्गत जागृती करण्यात यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम; जलप्रवाह सुरळीत होण्यासह पाण्याची बचत; शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्यास मदत
पुढील बातमी
एअर शोचे उत्कृष्ट नियोजन करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील; साताऱ्यात पहिल्यांदाच होणार एअर शो, प्राथमिक बैठकीत नियोजनाबाबत सूचना

संबंधित बातम्या