सातारा : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
सातारा शहरानजीक वाढे फाटा येथे रविवारी रात्री ट्रकची दुचाकीला धडक बसल्यानंतर त्यावरील युवक चिरडला गेला. अपघाताची घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली आहे. आकाश नंदकुमार गोळे (वय 18, रा.मंगळवार पेठ, सातारा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
by Team Satara Today | published on : 11 August 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा