सातारा : हॉस्पिटलच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान राजेंद्र शामराव शिंदे रा. सोनगाव, क्षेत्रमाहुली, ता. सातारा यांची मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा येथील पार्किंग मध्ये पार्क केलेली मोटरसायकल क्र. एमएच 11 बीजे 0384 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.