पुसेगाव : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिनी प्रतिमा पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य अंकुश भांगरे यांनी तसेच प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही प्रतिमांचे पुजन करून अभिवादन केले.
यावेळी विद्यालयातील सहशिक्षक तानाजी पाटील यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली .राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी अज्ञान अंधश्रद्धा याविषयी कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व दिवसाचे संपूर्ण गाव खराटा घेऊन स्वच्छता करायचे .व संध्याकाळी गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्यावे याविषयी जनजागृती करत असत .शिक्षणामुळे संपूर्ण समाजाचा व कुटुंबाचा विकास होतो. अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठीत्यांनी केलेले कार्य महान आहे तसेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानले याविषयी आपले मनोगत पाटील सर यांनी व्यक्त केले. संजय माने सर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.