चोरलेल्या दुचाकीप्रकरणी वनवासवाडीतील एक जण ताब्यात

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा  : बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील म्हावशे पेट्रोल पंपाजवळ संशयितरित्या आढळून आलेल्या एका जवळ हिरो होंडा कंपनीची दुचाकी आढळून आली. दुचाकी संदर्भात कोणतीही कागदपत्रे सादर करताना आल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 124 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष प्रकाश गाडगे (वय 36) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

विकास प्रभाकर कोळी (वय 19 रा.  मराठी शाळेजवळ वनवासवाडी,  ता. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले आहे. कोळी याच्या जवळ 50 हजार रुपये किमतीची टाकीवर निळी पट्टी असलेली हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल आढळून आली आहे. मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत त्याच्याकडून कोणतीही कागदपत्रे सादर झालेली नाहीत त्यामुळे त्यांनी ती दुचाकी चोरली असल्याचा संशय आहे.पोलीस हवालदार देशमुख एस. के. अधिक तपास करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुष्ठरोग शोध मोहिमेत तपासणीसाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी संतोष पाटील; जिल्हा समन्वय समितीची बैठक
पुढील बातमी
जुन्या वादाच्या कारणातून दारूच्या नशेत दांपत्याला जीवे मारण्याची धमकी

संबंधित बातम्या