सातारा : सातारा तालुक्यातील येथील हॉटेल धनश्री गार्डन येथे जेवणासाठी आणि दारू पिण्यासाठी वैभव उर्फ बारक्या पवार अभिषेक उर्फ गुंड्या विलास सावंत (दोघे रा. लिंब, ता. सातारा) हे आले असता त्यांना दि. २७ रोजी सूप पिल्याचे उधारीचे पैसे मागितले. याचा राग मनात धरून वैभव पवार याने शिवीगाळ करत कसले पैसे मागतो असे म्हणून त्याने हातातील पीव्हीसी पाईपने डोक्यात आणि पाठीत मारहाण करून जखमी केले. त्यानंतर तू आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर आम्ही तुझ्याकडे बघून घेतो, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली व हॉटेल धनश्री गार्डनचे बॅनर फाडून नुकसान केले याप्रकरणी हॉटेल कामगार मिलिंद गणेश पाटणकर (वय 58) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उधारीचे पैसे मागितल्याने हॉटेल कामगारास मारहाण; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
by Team Satara Today | published on : 30 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा