सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी सातारा एसटी स्टँड भाजी मंडई मधून उमर बागवान रा. शाहूपुरी, सातारा. मूळ रा. ल्हासुर्ने तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा बेपत्ता झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. 7 रोजी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी 19 वर्षीय युवती एलबीएस कॉलेज सातारा येथून बेपत्ता झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.