नवी दिल्ली : भारत सरकारने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठं पाऊल उचललं आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार केंद्र सरकारकडून 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेल्समध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही इत्यादीचा समावेश आहे. या चॅनेल्समध्ये माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे.
गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा एजन्सींविरोधात प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील, चुकीची माहिती पसरवल्याबद्दल भारताने अनेक पाकिस्तानी YouTube चॅनेलवर बंदी घातली आहे.
पाकिस्तानातील एकूण 16 यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात शोएब अख्तरचे चॅनेल आणि पाकिस्तानातील अनेक प्रमुख मीडिया हाऊसच्या यूट्यूब चॅनेलचा समावेश आहे. डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, बोल न्यूज, रफ्तार टीव्ही, आणि उजैर क्रिकेट इत्यादी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांच्या युट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे.
या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सचे भारतात 6.3 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी, जिओ न्यूजच्या सबस्क्रायबर्सची संख्या जास्त आहे. जिओ न्यूजचे 1.8 कोटी सबस्क्रायबर्स आहेत. तसेच एआरवाय न्यूजचे 1.4 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. समा न्यूजचे सुमारे 1.2 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. त्यामुळे या चॅनेल्सचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर पावले उचलली आहे. आता चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.